माझ्या सासूबाई
माझ्या सासूबाई
माझ्या सासूबाई
जणू कल्पवृक्ष दारी....
स्वतः राहिली उनात
कष्ट घेऊन पदरी ।।
आला जीवनी अंधार
दुःख गिळून घेतले.....
लेकरांना दिला परि
धीराने आधार ।।
माझ्या सासूबाई
जणू दिव्यातील वात....
स्वतः झिजली ही माय
दिला सर्वांना प्रकाश ।।
मंजुळ वाणी त्यांची
बोलके ते शब्द.....
परोपकारी वृत्ती त्यांची
झाले मी निःशब्द ।।
माझ्या सासूबाई
जणू मायेचा सागर....
सुखावले आम्हाला
यातना सोसल्या फार ।।
सासू सम कधी त्या
वागल्याचं नाही....
ऋणानुबंध सुरेख
सून झालेच नाही।।
माय लेकीचे हे नाते
सहवासाने फुलले....
पण याच मायेला मी
आज पोरकी झाले....
आज पोरकी झाले ।।
