STORYMIRROR

Poonam Wankar ( पूरवा )

Tragedy

3  

Poonam Wankar ( पूरवा )

Tragedy

माझ्या प्रेमाची व्यथा

माझ्या प्रेमाची व्यथा

1 min
170

रात्र रात्र लिहीत असतो

तिच्या माझ्या प्रेमाची कथा

आता काय सांगू राव

माझ्या प्रेमाची व्यथा..

शेतावरच्या धुऱ्यावर ती

ढोरं चरवत दिसली

अन् मलाही कळलं नाही

कशी विकेट माझी गेली..

मैत्रिणीनं तिच्या तिला

सुंदरा हाक मारली

अन् तेव्हापासून सुंदरा

या मनामध्ये भरली..

नुसतीच स्वप्न बघत तिची

मी पार गेलो थकून

म्हणून तिचा हात मागितला

थेट घरी तिच्या जाऊन..

लग्न लावून द्या आमचं

मी विनवण्या करू लागलो

खूप समजावत होते सारे

पण मी नाय माग हटलो..

शेवटी माझ्या जिद्दी पुढं

त्यांनी हार मानली, अन्

त्यांच्या घरची काळी म्हैस

माझ्या बाजूला आणून बांधली..

आता तुटलेलं हृदय माझं

कसं कागदावर मांडू

अन् माझ्या प्रेमाची व्यथा

आता कशी तुम्हाला सांगू

सांग कशी आता सांगू...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy