माझ्या मनात आज...
माझ्या मनात आज...
माझ्या मनात आज
विचाराचं काहूर उठलं,
असं कसं वादळ
अचानकच घडून आलं...
माझ्या मनात आज
काळजीचं सावट उमटलं,
कधी नाही ते एवढं
पाेटात धस्स झालं...
माझ्या मनात आज
अनेक विचारांची पेरण
उगवतील चांगले विचार
हेच माझं खरं धन...
माझ्या मनात आज
विचार फिरतात दाही दिशा,
मनाचे करताे मी व्यायाम
विचारच फिरवतील दशा...
