माझ्या कविता
माझ्या कविता


माझ्या कवितांना नसते कशाचेच भान
या कवितांना मला जरा जवळ घ्याल का?
कवितांना नसते कशाचेच भान
तरी कवीला कवितांची असते काळजी
शब्दातून मनात अन् मनातून हृदयात
ज्या त्या असतात त्या माझ्या कविता
मनाचे अन् हृदयाचे अतूट बंधन
माझ्या मनाचे सुख-दुःखाचे धागे
माझ्या कविता माझ्याशी एकरूप होऊनी
साऱ्या विश्वाला देई विश्व संदेश
माझ्या लाडक्या कवितांनो
मला विसरून जाणार नाही ना!