माझ्या दुःखाचे गणित
माझ्या दुःखाचे गणित
माझ्या दुःखाचे गणित
नाही कळले कुणाला
किती डागण्या बसल्या
माझ्या फाटक्या मनाला
डोईवर नाही छत माझ्या
परी आभाळाला काळजी
अन्नावाचून होते आबाळ
परी चेहरा असे निष्काळजी
साऱ्यांची फरफट डोळ्यादेखत
जीव तळमळत राही
चार घास मिळता हाती
चेहरे खुललेले पाही
