माझी शान मराठी
माझी शान मराठी
माझी शान मराठी माझी आन,
माझी शान मराठी भाषा माझा गर्व,
माझा अभिमान मराठी भाषा
अटकेपार झेंडा फडकला मराठीचा
अनोखा गोडवा माझ्या मराठीचा
धारदार रंग माझ्या मराठीचा
वैविध्याचा ढंग मराठीचा
प्रेमात मराठी,
क्रोधात मराठी
दुःखात मराठी,
सुखात मराठी
हृदयी आमच्या नांदते मराठी
नसानसांत भिनते मराठी
ताठ बाणा आमची मराठी
जीवाहून जास्त जपतो मराठी
माझी आन,बाण शान मराठी
