STORYMIRROR

Bharati Sawant

Inspirational

4  

Bharati Sawant

Inspirational

माझी मुंबई

माझी मुंबई

1 min
1.3K


नवी मुंबई आहे काल जन्मलेली

थोरलीने पाहिलेत पावसाळे हजार

वाढवलेत देशभक्त नि क्रांतिकारक

ज्यांनी देशासाठी झेललेत इंग्रजांचे अत्याचार


छातीवर झेलल्यात बंदुकीच्या गोळ्या

नि पाठीवर तलवारीचे वार

मुंबईनेच प्रसवलेय देशभक्तांना

ज्यांनी केलेय क्रूर इंग्रजांना ठार


इथल्या सागरानेच वाचवलेय

सावरकर नि सुभाषबाबूंना

ज्यांनी केले परदेशातुन साहाय्य

वीर क्रांतीकारकांच्या देशकार्यांना


वीरभूमी मुंबई जिने पाहिले

बाबू गेनूला समर्पण करताना

रानडे गांधीजी नि टिळकांसारख्या

इंग्रजांचे काठीचे तडाखे झेलतांना


अशा या मुंबईने हिंदू मुस्लिम शीख

इसाई एकवटलेय साऱ्या जातीधर्माना

अतिरेक्यांच्या बॉम्ब हल्ल्याने खचून

न जाता फिनिक्स प्रमाणे उडताना


महाप्रलयात अडकलेल्या एकमेकांना

सढळ मदतीचा हात देतांना

बॉम्बस्फोटातल्या जखमी झालेल्या

मुंबईकरांची निर्व्याज सेवा करताना


अशी ही थोरली बहीण

नक्कीच ठरेल सर्वश्रेष्ठ

म्हणून करूया तिला सलाम

नि मानुया तिला वरिष्ठ


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational