माझी मराठी
माझी मराठी
माझी मराठी
माय माझी ग मराठी, जसे हरी नाम ओठी |
लेकुरवाळी माझी माय , तिची शोभा वर्णू काय?
अनुप्रास, म्हणी, आणि वाक्यप्रचार,
तिच्या मांडीत शोभती छोटे गोड अलंकार |
नाम, सर्वनाम, सर्व तिचीच हि मुले |
त्यांच्या वीण काय शोभा? सारी हारातली फुले |
काळ, अर्थ प्रयोग, वाक्य विचार, समास,
सर्वानी सुशोभित, केले माझ्या या मातेस |
तेलगू, हिंदी आणि गुजराथी,या सर्वांत तू मोठी,
आजी संस्कृत मानाने भरते ग तुझी ओटी |
ज्ञानेश्वर, एकनाथ आणि संत तुकाराम,
तुझ्या मुलांनी या आई, वाढविला तुझा मान तुझी कन्या मी छोटी देते तुला ग वचन
जपीन तुला जन्मभर, बाळगीन अभिमान |
गोडी तुझी गं अवीट,बोलू तुला कौतुकीं,
माझी माय मराठी, अमृतातेही पैजा जिंकी |
मातृभाषा, मायबोली काय काय म्हणू तुला?
तुझीच कन्या व्हावे जन्मोजन्मी हेच मागणे देवाला ||