STORYMIRROR

Sushama Gangulwar

Tragedy Others

3  

Sushama Gangulwar

Tragedy Others

माझी माय

माझी माय

1 min
221

फुंकायची फुंकणीने 

चुलीमध्ये माझी माय 

लालसर दूधावरची आम्हाला 

द्यायची ती साय.....


आठवते आजही मला 

तिची लाल झालेले डोळे 

चूल फुकताना डोळ्यात 

धूर जाऊन व्हायचे ओले......


एका दिव्याच्या ज्योतीने 

उजळायच संपूर्ण घरं 

स्वतः रहायची उपाशी 

पण तिला सगळ्यांचे घोर......


सणासुधीला चुलीवर ती 

आवर्जून करायची पुराणांची पोळी 

घरातील सर्वांचे भरायची पोटं 

आणि ती खायची भाकरी शिळी.......


माझ्या आईच्या हाताला 

होती सुगरणीची चव 

संसाराचा गाढा चालवताना 

किती सोसायची ती घाव......


मातीच्या खोलीला लेप 

होती तिच्या मेहनतीची 

घराला एकत्र ठेवण्यात 

आधार तिच्या मायेची.....



Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy