माझी कविता
माझी कविता
हृदयात भावनांचा उठतो तांडव जेव्हा
विचारांचा डोक्यात गुत्ता होते जेव्हा
अन्याय ,अत्याचार जेंव्हा होतो डोईजड
साक्षात तेव्हा उतरते माझी कविता
परखड शब्दांची फोडणी घालते
विद्रोहाची मग आग ओकते
प्रेमाच्या जलधारा अमृत बरसते
कवी मनाची तहान भागवते माझी कविता
भावनांचा संशयकल्लोळ भारी
श्वास विश्वासाचे स्पंदन वरखाली
जखमांचा ओलावा रंग जीवनाचे
ओसंडून वाहते निर्झर माझी कविता
वेदनेवर फुंकर मायेची सावली
प्रेम, विरह दुःखाची फुले आत रोवली
शब्दांच्या रूपाने पानात फुलली
चुकलेल्यानां वाट दाखविते माझी कविता
मनाचा दर्प साहित्याचा अंकुर
बाजार व्यथेचा जीवनाचा शुभंकुर
न्याय , समता, समरसता व्याकुळ
प्रत्यक्ष दर्पण माझी कविता
