STORYMIRROR

Vijay Sanap

Drama

3.2  

Vijay Sanap

Drama

माझी आजी

माझी आजी

1 min
40.4K


माझी आजी आहे गुरू

साऱ्या घराचा ती पाया

आम्हा सगळ्यांवरती

तिची असायची माया ।।


आजी फारच मयाळू

प्रेम करी आम्हावर

खाऊ करते खायाला

सारे रानी गेल्यावर ।।


आई वडील रानात

आजी सांभाळी घराला

घरकाम सावरुन

चारा घाली वासराला ।।


माझी आजी घाली रोज

नित्य तुळशीला पाणी

करी काकडा भजन

जरी असेल आडाणी ।।


आजी म्हणे हरिपाठ

सारी मुले जमवून

मुले खेळता पावली

आजी जायची दमून ।।


माझी आजी गुणवान

गोष्टी सांगे छान छान

गाते रोजच अंगाई

नसे कधी मान पान ।।


हात पाय थकलेले

काठी आजीचा आधार

आजी सांभाळते सारा

घरीदारी कारभार ।।


आजी बोले खरं खरं

खोटे कधीही चालेना

सांगे रामायण कथा

नातू आजीला सोडेना ।।


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Drama