Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Madhubala Aute

Children

3  

Madhubala Aute

Children

माझी आई

माझी आई

1 min
260

खरं म्हणजे आईचे वर्णन करण्या

शब्दच फिके पडतील ,

शब्द -शब्द जुळवला तरी

शब्दच मुके पडतील ,

काय सांगू तुम्हांला 

गोडवा हिचा कसा

रसाळ आंबा खाल्ल्यावर

लागतो रस जसा ,

देखणे जसे रुप हिचे

रूपापरी देखणे मन,

स्पर्शामधुनी माया -ममता

जाणवते प्रत्येक क्षण

सासरी जाताना आईने दिला

अनमोल संस्काराचा ठेवा

ज्याच्यापुढे फिका पडतो

जामुन, जिलेबी अन् मेवा ,

आईच्या मिठीत असताना

किती गहिवरून येतं ,

रडू नको पोरी म्हणताना

तिचं अगदी काळीजंच रडतं.

Rate this content
Log in

Similar marathi poem from Children