Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Madhubala Aute

Tragedy

3  

Madhubala Aute

Tragedy

पावसाला जोर अन् जीवाला घोर

पावसाला जोर अन् जीवाला घोर

1 min
282

अगदी बावनकशी सोन्यासारखी

वदते माझी वाणी

मी शेतकरी हो शेतकरी

सांगू किती किती गार्हाणी ;

दुष्काळ आठवता क्षणी

टचकन डोळ्यात उभारतं पाणी

ओला दुष्काळ बघून मात्र

काळजाचं होतं पाणी पाणी ;

वीज खेळते लपंडाव

अन् निसर्ग देत नाही साथ

कर्जबाजारी होता होता

शेवटी पसरावे लागतात हात ;

शेतकऱ्यांचे कष्ट मातीमोल करण्या

पावसाने धरलाय चांगलाच जोर

विचित्रशा पिकांचे चित्र पाहता

जीवाला लागलाय घोर ;

कटाक्ष टाकुनी अंबराकडे

प्रश्न विचारी मनाला

सांग रे वरूण राजा

मी च तुझा काय गुन्हा केला ?

Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy