STORYMIRROR

Madhubala Aute

Inspirational

3  

Madhubala Aute

Inspirational

मी शाळा बोलतेय

मी शाळा बोलतेय

1 min
397

दार उघडता शाळेचे

अरे फळा लागतो रडू

मूग गिळून बसलेत पहा

पांढरेशुभ्र खडू


निरागस बोलक्या पाखरांशिवाय

गुरुजींना नाही करमत

छडी हातात घेतल्याशिवाय

हात नाही गप्प बसवत


घंटा सुद्धा बसली बरं का

कोपऱ्यात एका रुसून

ऑनलाईन शाळेला कंटाळलोय म्हणे

खरंच घरी बसून


मैदान सुद्धा डोळे लावून बसलंय

फक्त गोजिऱ्या लहानग्यांची

शाळासुद्धा वाट पाहते

दंगामस्ती करणाऱ्या पाखरांची


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational