STORYMIRROR

Madhubala Aute

Children

3  

Madhubala Aute

Children

शिर्षक - सध्या बालमनातील गीत

शिर्षक - सध्या बालमनातील गीत

1 min
261

सांग सांग भोलानाथ

कोरोना जाईल का ?

दिवाळीच्या नंतर तरी

शाळा सुरू होईल का ?

सांग सांग भोलानाथ


भोलानाथ दुपारी

आई झोपणार नाय

अभ्यासाची कटकट माझ्या

मागे लावणार हाय

सांग सांग भोलानाथ


भोलानाथ भोलानाथ

खरे सांग एकदा

आठवड्यातून रविवार

नको एकदासुद्धा

सांग सांग भोलानाथ


भोलानाथ खरंच आला

ऑनलाईन शाळेचा कंटाळा

आईचा बसता उठता

निघतो एकच गळा

अभ्यास नाही केल्यावर

मार देते बाळा


सांग सांग भोलानाथ

शाळा सुरू होईल काय ?


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Children