नारीशक्ती महान
नारीशक्ती महान
गरुड भरारी कर्तृत्वाची
घेऊनी उडते उंच अंबरी
विधात्याच्या सुंदर कलाकृतीची
अलौकिक शक्ती नारी भारी ;
पुष्पासम कोमल असुनी
प्रसंगी कणखर बनूनी हिरकणी
प्रेम अन् वात्सल्याची मूर्ती
तितिक्षेमधुनी बहरते हर मनी ;
ऋजुता वसते ठाई ठाई
पण नेतृत्वाची देते ग्वाही
कोणत्या ना कोणत्या रुपी
नारीशक्ती पुरुषांमागे मागे उभी राही ;
वक्र दृष्टीने पाहता कोणी
सज्ज ठेवती नयनांची समशेर
शत्रूने अगदी हार मानावी
नारीशक्ती समोर अखेर .