STORYMIRROR

Madhubala Aute

Children

3  

Madhubala Aute

Children

बालमनाचे देवासमोरील गाऱ्हाणे

बालमनाचे देवासमोरील गाऱ्हाणे

1 min
197

आता तरी सांग देवा

कधी उघडतील शाळा

ऑनलाइनच्या शाळेचा

खरंच आला कंटाळा


खडू नाही फळा नाही

गुरुजी अन् बाईंशिवाय

जरासुद्धा करमत नाही

घर बसल्या अभ्यास म्हणजे

काही केल्या करवत नाही


मित्रांसोबत खेळण्याची

काही वेगळीच मजा

एवढ्याश्या त्या कोरोनाने

उगाचच दिली सजा


टीव्ही मोबाईल मोबाईल टीव्ही

नुसतंच सारखं सुरु

आई अन् बाबा हात धुऊन मागे

बनून कडक गुरु


Rate this content
Log in

Similar marathi poem from Children