माझे स्वप्न
माझे स्वप्न
उडावे नभी होऊन खग,
विसावे शुभ्र ढगावर,
घ्यावी मुठीत अलगद चांदणी,
व्हावे माझे स्वप्न खरोखर..।
ऊन वारा पाऊस गारा,
बसावे इंद्रधनुच्या झोपाळ्यावर,
खेळावा खेळ नभांगणी,
व्हावे माझे स्वप्न खरोखर..।
घ्याव्या गिरक्या नभात सार्या,
स्वच्छंदी फिरावे भरभर,
सप्त आसमान ते पार व्हावे,
व्हावे माझे स्वप्न खरोखर..।
निळ्या नभाची निळाई,
रुतवावी ती मनात खोलवर,
जपले नयनात आज मी जे,
व्हावे माझे स्वप्न खरोखर..।
सांजवेळ ती शांत निरामय,
वाटे न परतावे घरट्यावर,
उडावे पसरून पंख नभातून,
व्हावे माझे स्वप्न खरोखर..।