STORYMIRROR

Raosaheb Jadhav

Inspirational

5.0  

Raosaheb Jadhav

Inspirational

माझे प्रजासत्ताक

माझे प्रजासत्ताक

1 min
442


माझे प्रजासत्ताक...


मेंदूलाही वसवू हृदयी

मानवतेच्या खास

इतिहासाचे पुरवील फुप्फुस

भविष्याला श्वास

प्रगतीसाठी वैश्विकतेच्या

फिरते ठेवू चाक...

माझे प्रजासत्ताक... हे माझे प्रजासत्ताक


माथ्यावरती गतिमानतेच्या

चैतन्याचा टिळा

विषमतेचा आतड्यांच्या

पोटी सोडवू पिळा

जागृतीला जागतिकीच्या

सक्षम देऊ हाक...

माझे प्रजासत्ताक... हे माझे प्रजासत्ताक


विणतील धागे मांगल्याचे

कौशल्याची वीण

होईल संक्रमित पेशी गर्भातून

सद्भावनेचे 'जीन'

दिव्यत्वा अन् विज्ञानाच्या

मानवतेचा धाक...

माझे प्रजासत्ताक... हे माझे प्रजासत्ताक


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational