माझे छत्रपती शिवराय
माझे छत्रपती शिवराय


थोर त्या जिजाऊमाता
पुत्र जन्मला शूरवीर
शिवबा पोटी त्यांच्या
सळसळती समशेर जणू
मूर्ती लहान परी किर्ती
महान आमच्या राज्यांची
अवघ्या चौदाव्या वर्षी केला
तोरणा हो सर
नव्हते राजांना मुगलांचे डर
औरंगजेबाच्या हातवर दिली तुरी
आग्र्यातून केले पलायन
गनिमीकाव्यात राजे महान
पळता भुई केली थोडी
हे नाही ओ खोटं
शाहिस्तेखानाची कापली बोट
पन्हाळगडाचा तह यादगार
अफ़जल खानाचा काढला
कोथळाच बाहेर
राजांचा एक-एक मावळा असा लढला,
प्रत्येकजण शिवबांनसाठी शेवटच्या
श्वासापर्यंत शत्रूला हो नडला
माझे छत्रपती शिवराय जगात महान
सातासमुद्रापार त्यांचा जयजयकार
राजे आपल्या देशाचा अभिमान
किती, काय सांगू त्यांची महती
राजे होतात तुम्ही म्हणूनच
आहोत आम्ही