माझे बाबा
माझे बाबा
बाबा तुम्ही होताता कर्तव्यनिष्ठची खाण
म्हणून आमुच्या हृदयीआहे तुमचे स्थान ||
बाबा तुम्ही होता मूल्यांचे पुजारी म्हणूनच आमच्यात आहे संस्काराची शिदोरी ||
जीवनाचे गणित सोडवताना तुम्ही सोडवले गुणाकार भागाकार
म्हणूनच मिळाला आमच्या जीवनास आकार ||
बाबा कठीण प्रसंगात दाखवला मार्ग तुम्ही
म्हणूनच प्रयत्नांची शिखरे गाठली आम्ही ||
प्रेरणा तुमची देत होती नवसंजीवनीची माया
म्हणूनच आमच्या जीवनात आहे प्रसन्नतेची छाया ||
जीवनात तुमच्या कधीच नव्हता अहंकार
प्रयत्न प्रयत्न करूनही केलीत स्वप्ने साकार ||
तुम्ही लावलीत आम्हा कडक शिस्त
म्हणूनच आमच्या आला वक्तशीरपणा मस्त||
तळहाताच्या फोडाप्रमाणे केलत माझे संगोपन
कन्यादान केलं बाबा तुम्ही अगदी आनंदानं ||
दाटल्या कंठानी, भरल्या डोळ्यांनी पाठवले मला सासरी
सांभाळा माझ्या पोरीला सांगुनी केलीत पाठमोरी ||
समजून घ्या सर्वांनीच बाबाला मनो-मनी
नका पाठवू म्हातारपणी वृद्धाश्रमात हीच एक विनवणी ||
माझ्या काव्यांची किती फुले वाहू बाबा तुम्हा
त्रिवार वंदन करूनी ध्येयनिष्ठेस सलाम तुम्हा||
