माझा राम हरवला
माझा राम हरवला
राम माझा हरवला
जगण्यात ना उरला ।।
वागण्यात न राहिला
तो आज केवळ मंदिरात बसला ।।
आज प्रत्येकाच्या मनी
रावणाचा अंश वसला ।।
राम मात्र जागेवरच थांबला
मर्यादेचा विसर पडला ।।
सत्तेचा मोह जडला
राम माझा फक्त राजकारणात राहला।।
घेतात नाव रामाचे
कर्म असती रावणाचे ।।
नको गर्जना नको पताका
मनातील राम तुम्ही जागवा ।।
मर्यादेचा धडा श्रीरामापासून शिकावा
रामराज्याचा अवलंब व्हावा ।।
