माझा महाराष्ट्र
माझा महाराष्ट्र
मराठी माझी भाषा आणि
मराठीच माझी संस्कृती
होवुनी गेले महाराष्ट्रात राजे,
समाजसुधारक, संत विभूती
शोभे राजे शिवाजी आमचे
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
महात्मा फुले, शाहू महाराज
बाळ गंगाधर टिळक, आगरकर
बाणा मराठी आमुचा
मराठी संस्कृती पुणे शहर
महाराष्ट्रात शोभे खास
कधी न उणे, विद्येचे माहेरघर
थंड हवेचे ठिकाण ते
चिखलदरा, खंडाळा
सोबतीने साथ देतो
महाबळेश्वर, लोणावळा
लाभले आम्हा अजेय
तीर्थस्थळ, तुळजापूर
माहूरगड मस्तकी
आणि वाडा कोल्हापूर
पांच ज्योतिर्लिंग उजवले
घृष्णेश्वर, औंढा नागनाथ
त्र्यंबकेश्वर, भीमाशंकर
नाचे परळी वैजनाथ
भक्तीचा भाव वाहतो
शिर्डी, शिंगणापूर
मनामनात ठेवू भक्ती
गाव शेगाव, पंढरपूर
वसा मराठी आमुचा
वाचू, मराठी - मराठी
जगू मराठी, जागवू
मनामनात साऱ्या मराठी
