STORYMIRROR

Manisha Awekar

Inspirational

3  

Manisha Awekar

Inspirational

माझा महाराष्ट्र

माझा महाराष्ट्र

1 min
12.2K

दुरोळी काव्यरचना

वर्णसंख्या १६


सह्याद्रीच्या सह्यकड्यांचे, मराठमोळे वीर

देशरक्षणा प्राणपणाने, तळहाती शीर(1)


शूर शिवाजी, छाव्याची महाराष्ट्र कर्मभूमी

पेशवाईची, रामशास्त्रींची

कामगिरी नामी(2)


भारतमाता मुक्त कराया, देशभक्त थोर

कवटाळिती प्रत्यक्ष यमा, सोडुनी संसार(3)


कर्मभूमी मराठमोळी, संगीत कलासक्त

आशा लता ग दि मा नि रविवर्मा भक्त(4)


अभंगातही थोर साधना, ज्ञाना, तुकयांची

एकनाथी भारुडे नि आर्या मयूरपंतांची(5)


वारकऱ्यांची परंपरा, भक्तिमार्गा लाभली

पंढरीच्या विठूरायापायी, भावभक्ती लोटली(6)


लोकधारा या भूमीची, लावणी, गण, गौळण

लोकनाट्य, कथा, गजाली,

कर्णमधुर कीर्तन(7)


साहित्यगंध दरवळतसे, अवघ्या विश्वात

बहिणाबाई, शांताबाई, पु. ल. वा. रा. कांत(8)


स्त्रिया प्रगतीशील, सर्वोच्च 

पद भूषविले

फुले नि कर्वे दांपत्यांनी, ज्ञानामृत दिधले(9)


महाराष्ट्र कर्मभूमी, लाभली थोर संचिते

पुनर्जन्मही याच भूमीत, मनीषा प्रार्थिते(10)


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational