STORYMIRROR

Aruna Garje

Inspirational

3  

Aruna Garje

Inspirational

माझा भारत देश महान

माझा भारत देश महान

1 min
167

माझ्या देशा भारत देशा

तुझा आम्हा अभिमान

लहरत राहो उंच तिरंगा

त्याची वाढत राहो शान


देश आमचा शेतकऱ्यांचा

सारे म्हणती कृषीप्रधान

सुखात राहो बळीराजा

त्याचा वाढवू आत्मसन्मान


सैनिक लढती सीमेवरती

तळहाती घेऊनी प्राण

देशरक्षणासाठी करती

ते सदा जिवाचे रान


स्वातंत्र्याच्या यज्ञासाठी

ज्यांनी अर्पिले आपुले प्राण

नित्य स्मरावे आपण त्यांना

देशाचे तेच आण बाण शान


 सुखसमृद्धी इथे नांदावी

ठेवावे याचे आपण भान

मुखी असावा एकच नारा

माझा भारत देश महान


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational