STORYMIRROR

सचिन विश्राम कांबळे

Inspirational

3  

सचिन विश्राम कांबळे

Inspirational

माझा बाबा

माझा बाबा

1 min
137

किती वेगळा होता ना रे तू 'बाबा '

मनात काय हे कधीच नाही दाखवायचा,

एकट्याने झेलायचा दाह दुःखाचे,

डोळ्यातल्या अश्रूंना कसं बरं तू लपवायचा...


किती गैरसमज होता बाबा तुझ्या बद्दल,

तू नेहमीच वाटला त्या जेलचा जेलर..

कधीच झुकावं नाही लागलं तू असताना,

आता कळून चुकलंय तू गेल्यावर....


'बाबा' कसा रे असा बनवला देवानं

इतक्या निधड्या काळजाचा तुला,

कष्ट उपसून कसं जमलं आनंदात राहणं,

तुझी परीक्षा घेऊन तो देवही असेल थकला...


बाबा ..!ये ना परत खूप बोलायचंय तुझ्याशी

तुला खळखळून हसताना पहायचंय,

उसळणाऱ्या त्या प्रत्येक दुःखाच्या लटांशी,

मला तुझ्या आधी युद्ध करायचंय...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational