माज कशाचा
माज कशाचा
सांग मानवा माज कशाचा???
घेऊन सोबत काय तू आला???
राखले संचित पूर्वजन्मीचे
त्या शिदोरीसह जन्म मिळाला...
कुणा मुखी सोन्याचा चमचा
कुणा मुखी ना घास सुखाचा
दैव रेखले त्या विधात्याने
तू केवळ कठपुतळी त्याचा...
सांग मानवा माज कशाचा???
सरणावर ना कोण विचारी
श्रीमंत का गरीब कोणता
अश्रू ढाळूनी क्षणभर सारे
मार्ग शोधती पुन्हा जगण्याचा
सांग मानवा माज कशाचा????
कुणा जन्मभर लाभले दारिद्र्य
कुणी द्वारकेचा झाला राजा
खाऊनी पोहे सुदाम्याचे का
संतृप्त जाहला स्वामी जगाचा
सांग मानवा माज कशाचा????