नव्या जगाच्या उंबरठ्यावर
नव्या जगाच्या उंबरठ्यावर


स्विकारु आव्हान विकासाचे
नव्या जगाच्या उंबरठ्यावर
समृद्धतेने देश घडावा
राहू आम्ही सदैव तत्पर...१
गौरवशाली इतिहासाची
शान राखते गड किल्ल्यांवर
मराठ्यांच्या त्या शूर कथांचा
ठेवू जपून हा साठा सत्वर....२
वृक्षतोड ना अजून व्हावी
वृक्षसंवर्धनाचा करुया जागर
दान दैवी लाभले देशाला
त्रिकाठी याच्या महासागर.....३
शिक्षणाचा महामेरु उभारु
विज्ञान प्रगतीचा करु स्विकार
अन्न, शिक्षण, प्रगतीसाठी
साऱ्यांना समान अधिकार....४
ना फासावर जावा पोशिंदा
मिळावी साऱ्यांस पोटभर भाकर
आधुनिकतेचा मुलामा चढता
माणुसकीला ना द्यावे अंतर.....५
घराघरातून सैनिक जन्मावा
स्वाभिमान जपावा खडतर
देशप्रेमाची ज्योत तेवावी
तिरंगा फडकावा निरंतर......६