पैठणी
पैठणी


काया कोमल, सजले साजण
तुमची मी सजणी....
नेसली मोरपंखी पैठणी....।।धृ।।
तार सोन्याची गुंफली जरी
रत्नजडीत हा पदर भरजरी
मोरपिसांची नक्षी रेखली
नेसली मोरपंखी पैठणी.....१
पहिल्या भेटीची खूण साजणा
पदरी खेळे वारा का पुन्हा
ओढ आगळी लागली
नेसली मोरपंखी पैठणी.....२
गुपित मनीचे सांगू मी कुणा
रेशमी धागे बांधले पुन्हा
सजली श्रृंगारली
नेसली मोरपंखी पैठणी.....३