STORYMIRROR

Rajashri Bohara

Others

4  

Rajashri Bohara

Others

जगण्याचं बळ

जगण्याचं बळ

1 min
383

एक हसू निरागस

जेव्हा चेह-यावर उमटतं

खरं सांगू जगण्याचं बळ

तेव्हा आपोआप एकवटतं...।।धृ।।


चमकतो आशेचा किरण

निस्तेज अशा डोळ्यांत

आणि अस्पष्ट शब्दातून

सारं भावविश्व दाटतं

खरं सांगू जगण्याचं बळ 

तेव्हा आपोआप एकवटतं....।।१।।


प्रेमाशिवाय कोणतीच 

भाषा कळत नाही

स्पर्शात कधीही स्वार्थता नाही

एका स्मितहास्यातून

नातं जुळत जातं

खरं सांगू जगण्याचं बळ

तेव्हा आपोआप एकवटतं....।।२।।


विचारांचे हेवेदावे 

जिथे फोल ठरतात

थरथरत्या हातांनीच का होईना 

एकमेकांना सावरतात

जिथं प्रत्येक जण दुस-याला 

सहज समजून घेतो

खरं सांगू जगण्याचं बळ

तेव्हा आपोआप एकवटतं...।।३।।


वय वाढतं जास्त फक्त

मन मात्र लहानच राहतं

न संपणारं बालपण त्यांना

आजन्म मिळालेलं असतं

त्या निरागसतेशी जेव्हा नातं जुळू लागतं

खरं सांगू जगण्याचं बळ 

तेव्हा आपोआप एकवटतं...।।४।।


Rate this content
Log in