STORYMIRROR

Rajashri Bohara

Children Stories

3  

Rajashri Bohara

Children Stories

चॉकलेटचा बंगला

चॉकलेटचा बंगला

1 min
11.6K

आज स्वप्नात तर बाई 

भारीच मजा आली

भेटायला मला चक्क

चॉकलेटची फॅमिली आली...


डेरीमिल्क काकांनी 

दिली गोड झप्पी

किटकॅट काकुंनी 

घेतली गालावर पप्पी...


जेम्सच्या चिमुकल्या

गालावरच्या खळीत बसल्या

पाहूनी जीभ रंगबिरंगी

खुदकन हसल्या...


5 स्टार चॉकलेट दादा, 

थोडा खट्याळ वाटला

घेता चव त्याची

दातातच चिकटला...


पर्क आणि फ्युजची 

चालू होती मारामारी

दोघे विचारु लागले

दोघांत कोण लय भारी...


चॉकलेटचा खेळ छान

स्वप्नात असा रंगला

त्यांच्यासाठीच बांधला मी

चॉकलेटचा बंगला...


Rate this content
Log in