वंदन देशसेवकांना
वंदन देशसेवकांना
आली जीवघेणी महामारी
ग्रासल्या तिने दिशा चारी
रोग भयंकर विषाणुंचा
संहार मांडला भुमीवरी...
स्थिर जाहली गती सारी
भयपूर्ण मानव चराचरी
जगण्याची धडपड करताना
मरणाचे दडपण बसे उरी...
आळवती देवास हे धर्म पंथ
जाहली बंद देवालये सारी
धावले मानवी रुपातूनीच
पोलीस, डॉक्टर, परिचारी...
दिनरात अखंडीत कार्यतत्पर
निज, अन्न त्यागले देशाखातर
दिसला देव त्यांच्या रुपी
राखली माणुसकी निरंतर
घेतले व्रत ते सेवेचे
घर दार विसरुनी झटताना
वाचवले जीव ते किती सारे
हे वंदन देशसेवकांना...