विठू माऊली
विठू माऊली

1 min

11.7K
झरे वाहती हे आषाढी वर्षाचे
उभ्या पंढरीतून विठू नाम गाजे
टाळ, चिपळ्या नी झांजा माउलीचा गजर
तुझ्या दर्शनाशी चालती पाय माझे !!!
चंद्रभागे किनारी तुझी रे पंढरी
दहा दिशांनी येती वारकरी रे तुझे
तू भक्तीचा दास, तू माझी कैवारी
मुखातून यावे सदा नाम तुझे !!!
अनंतात तुच, तू चैतन्य रुप
तू माय नी बाप, तू सर्वस्व माझे
तुझा हा रे देह, तू श्वासात माझे
निराकार निर्गुण तू आत्मज माझे!!