माई
माई
माया सरली सरली
आठवण उरली उरली
थरकाप त्या क्षणाचा
माय निजली निजली
आसवांच्या पूरामंदी
माया दाटूनिया आली
अनाथांची लेकुरवाळी
आज निरोपा धाडली
हंबरलं गं वासरु
तोडी दावणं दावणं
दर्शना मायेच्या आज
विसरुनी भूक तहान
माझी माय निजली गं
कोटी पिढ्यांची माऊली
गवसना आज आम्हा
माझ्या मायेची साऊली
गहीवरला तो काळ
कशी अंधारी सकाळ
हरवला उषःकाल
नाही माईचा आवाज
कसली नाती रगताची
इथं नात्यांचं रगात
माईनं दिलया उरात
आम्हा आयुष्य भरात
ठायी ठायी आठवण
जीवाची उलघाल
अनाथांची माऊलीही
दिली मोलाची गं शाल
तुम्हा जोडूनिया कर
विनवणी दादा एक
नको डीपी स्टेटसात
माय ठेव रं ह्रदयात
तुझ्या घासातला घास
घालं अनाथांना आज
तुझ्या कमाईचं सोनं
तुझी होईल आबादान
