माहेरनी आखाजी
माहेरनी आखाजी
ऊना सण आखाजीना
भाऊ ये लेवाले मु-हाई.
चार दिनना विसावा साठे
बहिण दखे वाट डोया लाई.
बाप व्हये खुशी मनमाज
माय म्हणे लाडी मनी ऊनी.
भाऊ बांधे झोका लिंबले.
बहिण सासरवाशी रे मनी
आथानी कैरी तथानी कैरी
गाणं सईसंगे झोका खाऊ.
डोकावर तांब्या गौराईना
गौराईले पाणी लेवाले जाऊ.
लाटपाटले सांद-या लाटीनी
जावूत आम्ही शंकर लेवाले.
व्हये सुख दुःखन बोलणं
सई बलाये आखाजी खेवाले
भाऊ बहिणना प्रेमसाठे
दिवायी आखाजीले माहेर.
नको विसरू भाऊ बहिणले
नको साडी चोयीना आहेर.
सासरले समद सुख पण
माहेरनी सर येवाव नहीं.
दिवायी आखाजीना सण
सुखनी गणती कोठे व्हयी.
