माघार
माघार
कधी..कधी जीवनात...
घ्यावी लागते माघार,
कमीपणा नाही यात
योग्यच असे सुरूवात!
मी मोठा तू छोटी...
असे करत बसलात,
कसा लागायचा मग !
नात्यांचा निकाल ?
चुकीच्या रस्त्यावर...
घेऊ वेळीच माघार !
सुटतील सारे प्रश्न...
अन् स्वप्न होईल साकार !
