लवकरच जाणार हे जूणे वर्ष"
लवकरच जाणार हे जूणे वर्ष"
लवकरच जाणार हे जुने वर्ष
द्यावी शुभेच्छा नवीन वर्षाला सहर्ष
उणे बेरीज करून बघा काही उरलंय कां?
नसेल तरी मन मारून दाखवा उत्कर्ष!
जरी सुखासाठी शोधत-शोधत
दाही दिशा भटकत भटकत
प्रेमाची बोली बोलत बोलत
आनंदाला बोलवायचे कन्हत!
हृदयातले शल्य स्वस्थ बसतील
डोळ्यांतील अश्रू पुरवतील रसद
तरी ही आपण साथ नाही सोडायचा
कधीतरी मिलन होईल कदाचीत सुखद!
या प्रितीत दोघे आपण रमलोय
एक दुसऱ्यासाठी आहे जगलोय
जन्मोजन्मी आहे मी तुझा तू माझी
सुखदु:खाला पुरता मी समजलोय!
जीवन आहे खपल्यावरचे औषध
खऱ्या खोट्या मात्रा डोसाने भरत
संजिवनी सारखी घ्यायची चाखत
नाक दाबून ती ढकलावी पोटात!
