लसीकरणाची गंमत
लसीकरणाची गंमत
लसीकरणाची आज झाली गंमत,
उभे राहिलो सगळे एका रांगेत.
सामाजिक अंतर होते पाळायचे,
लसीकरण होते अठराच्या वरच्यांचे.
आधीच झालो होतो कोरोनाने हैराण,
लाॅकडाऊन मुळे विसरलो होतो भान.
जशीजशी वेळ येत गेली जवळ,
वाढली धडधड, मनात होई कळकळ.
लस टोचून घेताच, बाहेर पडले सारे,
भीतीपोटी लसीच्या डोकं गर गर फिरे.
माई, ताई, आक्का, रांगेत मारी गप्पा,
कसे उभे राहून, पार करू हा टप्पा.
दिसे सगळ्यांचे फोन मध्ये डोके आत घुसलेले,
तर कुठे कोणाचे फोनवर मोठ्याने बोलणे चाललेले.
एकदाची घेतली लस डोळे झाकून,
वाटले आता जिंकले जग, स्वतः सांभाळून.
असे झाले आजचे लसीकरण,
धन्यवाद देता सेविकास, टाळे लोकांचे मरण.
