लपून छपून प्रेम
लपून छपून प्रेम
आवडतो ना गं मी तुला
मग अशी घाबरते का तु
बोलून टाक तीन शब्द प्रेमाचे
इतकी लाजतेस का गं तु
करतेस ना गं प्रेम माझ्यावर
मग अशी लपून का राहते
समोर येऊन बोल माझ्याशी
का गं तु मला चोरून पहाते
जेवळ येऊन भेटत जा गं
लपूनछपून बघण्यात अर्थ नाही
जरी खर प्रेम करत असली
तरी ते काही साध्य होत नाही
कळतंय गं मला आता सगळं
माझी तुला खुप आठवण येते
लपाछपीचे प्रेम करून गं तु
का स्वतःला इतका त्रास देते
का लाजतेस इतकी तु बोलायला
एकदा मनातले विचारुन तर बघ
आता तुझ्या प्रेमाची खरी सुरुवात
तु माझ्यासोबत करून तर बघ
तुझा साथी बनायला गं
मला नक्की आवडेल
हे तुझे खरे प्रेम तुला गं
विचारल्यावर नक्की सापडेल

