लॉकडाउन संवाद...
लॉकडाउन संवाद...
आहे ते चांगलंच काहीसं चाललेलं
मधेच धूर्त कोरोनाचा आग्रह झाला
धावपळीत घर की जग विसरलेला
अचानक घरातंच अडकला
त्याच त्या मरगळलेल्या जगण्याला
त्यातूनही एक दिलासा मिळाला
मनामनातला शाब्दिक संवाद
ऑडिओ, व्हिडिओ कॉल्समध्ये सापडला
वेगवेगळी पात्र साकारणारा
रटाळ झालेलं जगणं नव्यानं शिकला
कुणी जवळ तर कुणी दूर
असा प्रत्येकजण घरपण जगला
लॉकडाउनमध्ये हरवलेला माणूस
व्हर्चुअल जगात का होईना गवसला
कधी वाईटातूनही घडतं चांगलं
असंच जणू काही अनुभवलं...
