लोकशाही...
लोकशाही...
गुलामगीरीच्या साखळ्या तोडून ,
स्वतंत्रता दिलखुलास हसली ,
संविधान मांडता साहेबांनी ,
लोकशाही भारतात फडकली ...
लोकांनी लोकांसाठीच निवडून ,
भारतात ही सत्ता मांडली ,
आजही आहे का? तिच लोकशाही,
संशयाची पाल चुकचुकली...
किती भाकिते सांगितली,
खऱ्या खोट्याची ना कळली ,
सत्य लिहीणारी शाई म्हणे ,
लिहीता लिहीता नासली ...
मिळवण्यासाठी लोकशाही ,
महात्मे हुतात्म्यांनी पर्वा ना केली,
झोकून दिले संग्रामात स्वतःला,
त्यांच्या रक्तांची नदी वाहिली ...
जाण ठेवा त्या माणसांची,
आज तुमच्या स्वाधीन केली,
लोकशाही विसरू नका कधी,
एक एक मताने सत्ता पलटली...
