STORYMIRROR

Umesh Salunke

Abstract

3  

Umesh Salunke

Abstract

लोकं नेहमी बोलतात......!

लोकं नेहमी बोलतात......!

1 min
315

लोकं नेहमी बोलतात 

माझ्या मनात काहीच नसते.....!


लोकं नेहमी म्हणतात 

माझं मन निर्मळ आहे

दुसऱ्याची निंदा करून

झाल्यावर सांगतात......!


माझ्या मनात तसा विचारही नाही

बोलून गेलो मला कळलेच नाही.....!


लोकं नेहमी बोलतात

माझ्या मनात असं काही

बोलण्यासारखं नव्हते...…!


असा एक दिवस नाही की

आपल्या आयुष्यात 

आपल्याला त्रास दिला नाही.....!


असा एक दिवस नाही की

आपण कुणाला रोज वाईट

बोललो नाही.....!


असा एक दिवस नाही की

आपल्या हातून चुक झाली नाही.....!


असा एक दिवस नाही की 

आपली हाताची मूठ झाकून दुसऱ्याची

पाचही बोटं आपल्याकडे वळल्यशिवाय

रहात नाही......!


असं कधीच होत नाही

आपला एकही क्षण

मनात असणाऱ्या विषयाला

वाचा फोडल्याशिवाय राहत नाही.....!


लोकं नेहमी म्हणतील

माझ्या मनात काहीच नाही.....।


आपलं सर्वांचं मन कधीच निर्मळ नाही

असं म्हणू शकत नाही.....!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract