★लक्तर नात्याचे★
★लक्तर नात्याचे★
नात्यांमधले अवघडलेपण
जपता जपता
दुराव्यांचा बोलकेपणा
जास्त वाढत गेला
सूर जुळता जुळता
कळेना कसे तो
घट्ट विणीचा धागाच
वेगळा काढत गेला
आता वीणही नाही
अन नातेही नाही
अलवार शहरणारे
मनाचे पातेही नाही
गुणगुणलेल्या गीतांचे
आज भेसूर तराणे झाले
हरेक शब्द बोललेले
दूषणांचे नजराणे झाले
जुळले जरी नव्याने
मन राहील निरुत्तर
जीर्ण झालेल्या नात्याचे
पांघरावे लागेल लक्तर...
