STORYMIRROR

Meenakshi Kilawat

Inspirational

2  

Meenakshi Kilawat

Inspirational

लक्ष्मनरेषा

लक्ष्मनरेषा

1 min
13.9K


भारतीय स्त्री ही आहे

नव्या युगाची नारी

देवू नका कोणी आता

आम्हा हो ललकारी.  

भारतिय स्त्रीची ही आहे

जळजळीत अमर कहाणी

छेडू नका अबला समजून

ती आहे अमुल्य हिरकणी

अबला नाही आता आम्ही

सक्षमंता अमुच्या अपरंपार

करू देवू नका परक्याला

विनयभंगाची लक्ष्मनरेषा पार.    

स्त्रीजातीची रक्षा करण्यासाठी 

करूया सर्व मिळूनीया सामना

चला भगिनी उठा आता तुम्ही

करू नका अन्याय हा सहन

आहो आम्ही भारतीय स्त्रीया

चला मिळून करूया संधान

दुरीतांचा करूया सामना

घेवूनी हाती त्रिशुळ अन् बाण.

कोणी आता न सहन करावे

टपोरी लोकांचे चालचाळे वारे

इज्जत आबरूला धक्का नको

उल्लंघनाची शिक्षा देवूया सारे.    

पराक्रमाचा इतिहास मोठा

आमच्या आहे लल्लाटी छान

आम्ही आहोत भारताची शान

संस्कार आहे आमुचे महान.

सावित्रीबाई, अहिल्याबाई

इंदिरा गांधी मॉ जीजाउ मान 

कल्पना चावला, लक्ष्मीबाई

सिंधुताई असे आमुचा अभिमान.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational