लग्न झालेला पण कुवारा
लग्न झालेला पण कुवारा
लग्न करून ही तो कुवारा असतो
कारण तो खूप प्रेमळ असतो
त्याचे हृदय इतके मोठे असते
की बस कंडक्टर सारखे प्रत्येकाला
आत घेऊन जागा देतो
कारण तो खूप प्रेमळ असतो ।।
बायको वाटते फुलनदेवी
मैत्रिणी मात्र अप्सरा
कामवाली बाईत दिसते करिश्मा
शेजारीण ला बघताच आठवते हेमा
हृदय त्याचं कधी हाऊसफुल्ल च नसतं
कारण तो खूप प्रेमळ असतो ।।
पाहुणे येणार समजताच
अंथरुणात च लोळतो
मैत्रीण येणार बायकोच्या
केस रंगून हिरो तयार होऊन बसतो
बायकोच्या पहिले स्वागत तोच करतो
कारण तो खूप प्रेमळ असतो ।।
नटलेल्या बायकोला
बघायला वेळ नसतो
बाहेरच्या गोबीत
गुलाब मात्र शोधतो
मनातल्या मनात सर्वावर प्रेम करतो
कारण तो खूप प्रेमळ असतो ।।
चाळीशी गाठतो
पण सिंगल म्हणून सांगतो
मला कोणी चांगलं भेटल च नाही
हा त्याचा डायलॉग असतो
लग्न करूनही तो कुवारा असतो
कारण तो खूप प्रेमळ असतो ।।
