लेखणी
लेखणी
न बोलता सर्वकाही सांगते ती लेखणी
एक धारदार असे शस्त्रे म्हणजे लेखणी
चुकून चूक झालेल्यांना शिक्षा करते लेखणी
सर्वांना एका पारड्यात तोलते लेखणी
वाणीवर नियंत्रण ठेवायला लावे ही लेखणी
उच- नीच भेदभाव करत नाही लेखणी
अधिकाराची जाणीव करून देते लेखणी
प्रत्येक परिस्थितीत कर्तव्य बजावते ही लेखणी
साधारण असो वा उच्च तेवढ्याच ताकदीची लेखणी
जपून वापरे हरएक जण अशी ही लेखणी
प्रेमाची कबुली एका शब्दानं सांगणारी ही लेखणी
मायेचा ओलावा बोलुन जाणारी प्रेमळ लेखणी
आसवांच्या सोबतीला सदा असणारी लेखणी
आठवणींचा कप्पा घट्ट धरून ठेवते लेखणी
प्रत्येक मुलीची पहिली मैत्रीण असते लेखणी
मनातलं कागदांवर उमटवल्याचा आनंद देई लेखणी
उगाच केसांशी खेळत राही ही लेखणी अगदी
जीवाभावाची सोबती,सखी आहे लेखणी तिच्याशिवाय
आयुष्यच काय मनुष्य देखील उणी अशी आपली लेखणी
