STORYMIRROR

kusum chaudhary

Inspirational

4  

kusum chaudhary

Inspirational

लेक

लेक

1 min
370

जन्मदात्री ग तू आई

मारू नकोस फुंकर

ठेव पणतीला जपून

करील‌ अंधाराला दूर


आजही पणती विझवते

हवा वंशाला दिवा तुला

 भेदभाव करून नको

मारू गर्भातच ग मला


नको मज दुसरे काही

जन्म घेऊ दे आई मला

शिकून मी मोठी होईल 

 दु:खात साथ देईल तुला


मुलगा वंशाचा दिवा जरी

कोण जन्म देईल त्याला?

 आई बहिण पत्नीसाठी

आई जन्म घेऊ दे मला


घराला घरपण ग येईल 

आई जन्म घेऊ दे मला.

 दोन्ही कुळांचा उध्दार

करीन नको मारू ग मला


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational