लेक वाचवा
लेक वाचवा
तुमच्यासारखे मलाही
हे जग पाहायचे आहे
मारु नका गर्भातच
मलाही जगायचे आहे
फुलपाखरापरी आहे मी
मलाही बागडायचे आहे
नका छाटू पंख माझे
मलाही भरारी घ्यायची आहे
रक्षाबंधनाचा सण साजरा करुन
भावाला ओवाळायचे आहे
भावा-बहिणीतील प्रेमळ नाते
असेच पुढे जपायचे आहे
बहिणी-बहीणीतील गमती-जमती
मलाही अनुभवायच्या आहेत
प्रेमातील हा ओलावा
मलाही जपायचा आहे
मुलगी आहे चैतन्य घरातील
तिला घरी आणायचे आहे
खुडू नका या कळीला
सुगंध दरवळू द्यायचा आहे
आजच्या काळातील स्ञी-भ्रूणहत्येचा
प्रश्न सारखा उद्भवत आहे
त्या कोवळ्या जीवालाही
जग दाखवायचे आहे
