लेक मी सावित्रीची
लेक मी सावित्रीची
लेक मी सावित्रीची
घेतला लेखणीचा वसा,
लेखणी बळ देई विचारांना
उमटेल साहित्य जगात ठसा.
घेतली शिक्षणाची मशाल हाती
चिखलफेकीने झाली माई बेजार,
तरीही कणखरपणे उभी राहिली
नाही पत्करली कधीच हार.
रूढी परंपराचे स्तोम होते
नायनाट त्यांचा करण्या सरसावली,
सावित्री माई माझी बघा तिने
जिद्द आणि चिकाटीची शिदोरी आम्हा दिली.
करूनी स्मरण सावित्री माईंच्या विचारांचे
मातॄत्व,नेतृत्व,कर्तुत्व पार पाडते आहे,
सावित्रीची लेक मी जगभरात
नारीशक्तीचा झेंडा उभारते आहे.