STORYMIRROR

VINAYAK PATIL

Inspirational

4  

VINAYAK PATIL

Inspirational

लढाई

लढाई

1 min
338

घरटे उडती वादळात

बिळात शिरते पाणी

अवसान गाळुनी सांगा

आत्महत्या करते का कोणी 


परिस्थिती कोणतीही असो  

आम्ही लाचारीने जगत नाही

काही मिळाले नाही म्हणून

अनुदान कुणाकडे मागत नाही 


हात नसे पक्ष्यांना

चोच घेऊन जगती

स्वतः बांधती घरटे

कुणाची मदत न घेती 


कुणीही नाही सोबती

तक्रार नाही या ओठी

निवेदन घेउनी वणवण

न फिरे कोणत्या योजनेसाठी 


कष्टकऱ्याची जात आपली

आपणही हे जाणलं पाहिजे

पिंपळाच्या रोपा सारखं

पाषाणावर टिकलं पाहिजे 


निर्धार करु जिंकन्या

पुन्हा यशाचा गड

आयुष्याची लढाई

फक्त हिमतीने लढ. 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational